सोप्या पद्धतीने चमचमीत Chicken Dum Biryani | Chicken Biryani recipe | Biryani Recipe | Chicken |

  Рет қаралды 480

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

2 ай бұрын

Chicken biryani | hyderabadi chicken biryani zafrani chicken biryani | chicken biryani by Swarupa's kitchen | how to make chicken biryani at home |
साहित्य -
१. बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
२. चिकन - अर्धा किलो
३. तूप - ३ चमचे
४. तेल - ६ ते ७ चमचे
५. दही - ३०० ग्रॅम
६. कांदा - ८ ते ९
७. अद्रक लसूण पेस्ट - २ चमचे
८. हिरवी मिरची - २ ते ३ ( तुमच्या आवडीनुसार )
९. हळद पावडर - २ चमचे
१०. धने जिरे पावडर - १ चमचा
११. लाल मिरची पावडर - २ ते ३ चमचे ( तुमच्या आवडीनुसार )
१2. काश्मिरी मिरची पावडर - २ चमचे
१३. शाही बिर्याणी मसाला - २ चमचे
१४. अख्खा गरम मसाला - १ लवंग,४ काळीमिरी,१ इंच दालचिनी,२ तमालपत्र, १ चक्रिफुल
१५. गरम मसाला पावडर - १ चमचा
१६. शाह जिरे - अर्धा चमचा
१७. पुदिना - १ छोटी वाटी बारीक चिरलेला
१८. कोथिंबीर - १ वाटी छोटी बारीक चिरलेला
१९. फूड कलर - पिंच
२०. कोळसा - २ छोटे तुकडे
२१. मीठ - चवीनुसार
२२. पाणी - आवश्यकतेनुसार
पूर्वतयारी -
चिकन स्वच्छ धुवून घेणे. तांदूळ भिजत ठेवून द्या. कोथिंबीर पुदिना कांदा बारीक चिरून घ्या. अद्रक लसूण पेस्ट करून घ्या. सर्व मसाले काढून ठेवा.
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात चिकन घ्या. त्यात दही,हळद,मिरची पावडर,काश्मिरी पावडर,गरम मसाला पावडर, शाही बिर्याणी मसाला,धना जिरे पावडर,अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लिंबूचा रस,कोथिंबीर आणि पुदिना घालून सर्व मिश्रण एकजीव करून एका बाजूला ठेवून द्या. आता एका कढईत थोड तूप घालून घ्या..त्यात अख्खा गरम मसाला आणि शाह जिरे घालून परतवून घ्या. मग त्यात पाणी घाला. पाण्याला एक उकड आली की त्यात भिजवलेला बासमती तांदूळ आणि चवीपुरतं मीठ घालून भात ७०% ते ८०% पर्यंत शिजवून घ्या. शिजवलेला भात एका चाळणीमधून गाळून सर्व पाणी काढून घ्या.आता दुसऱ्या कढईत तेल टाकून घ्या. तेल छान गरम झाले की त्यात कांदा टाकून थोडा लालसर होईपर्यंत काढून घ्या. अर्ध्या कांद्याची मिक्सरला लावून बारीक पेस्ट करा आणि अर्धा कांदा ठेवून द्या. आता त्याच कढईत तेल घालून ते गरम झाले की त्यात मॅरीनेट केलेलं चिकन टाकून १० ते १५ मिनिट थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून शिजवून घ्या. मग त्यावर भाताचां लेयर पसरवून घ्या. त्यावर फूड कलर गुलाबाच्या पाण्यात मिक्स करून थोडा पसरवून घ्या. त्यावर थोडा लालसर कांदा, बारीक चिरलेली कोथींबर आणि पुदिना घालून एक १० ते १२ मिनिट झाकून कमी गॅस वर ठेवा. नंतर त्यात एका वाटीत गरम केलेलं कोळसा आणि त्यावर तूप घालून लगेच झाकण लावून घ्या.२ ते ३ मिनिट ने झाकण काढून घ्या.आता आपली चिकन दम बिर्याणी तयार झाली आहे. गरमागरम चिकन बिर्याणी (काकडी- कांदा- टोमॅटो) रायता बरोबर सर्व्ह करा.
टिप -
१. कांदा लवकर लालसर होण्याकरता थोडंसं मीठ घाला. म्हणजे कांदा लवकर लालसर होण्याकरता मदत होते.
२. ग्रेव्हीत जर खूप पाणी झाल असेल तर त्यात थोडा तळलेला कांदा आणि कोथिंबीर पुदिना किंवा थोड दही घालून झाकण ठेवून दया.

Пікірлер: 2
@shreem5200
@shreem5200 2 ай бұрын
Looks Delicious 😍...nice recipe 👌
@edmraveland
@edmraveland 2 ай бұрын
Some feedback 1. use proper mic / clear bright lighting setup voice is breaking 2. Ingredients details in video Marathi 3. Use timestamps 4. Most important cathy thumbnail 5. Most important use cathy title 6. Most important use trends # hastag similar with videos/ recipes for mor views & reach 7. Please mention ur social media insta , FB page details fore reach more views 8. Try to film intro & outro
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,6 МЛН