सातपुडा आदिवासी जनसंवाद अभियान १ ते ९ जून, २०२४ सातपुड्यातील गावपाड्यात जाऊन आदिवासी अस्तिवावर चर्चा

  Рет қаралды 3,241

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

2 ай бұрын

सातपुडा आदिवासी जनसंवाद अभियान (१ ते ९ जून, २०२४)
आदिवासी युवा उलगुलान महामेळावा, मोलगी ( ९ जून, बिरसा मुंडा शहादत दिवस निम्मित)
सातपुड्यातील आदिवासी समाज बांधवांना, जोहार...!
नंदूरबार जिल्हा निर्मिती 1998 होऊन आता 26 वर्षे होत आली परंतु आजही जिह्यावर कुपोषणाचा कलंक कायम आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून आदिवासींच्या न झालेल्या विकासामुळे स्थानिक आदिवासी अजून जास्तच गरीब होत असून लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी आदिवासी लोकांचे प्रचंड शोषण होत असून आदिवासींचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विकास इतर समाजाच्या मानाने अतिशय संथ गतीने व कागदावर होत आहे. आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर व स्थानिक जागी रोजगार उपलब्ध नसल्याने आदिवासींची आर्थिक स्थिती अजूनही सुधरण्याची परिस्थिती नाही, सरकारची तशी मानसिकता नाही. जल, जंगल व जमीन यावर आधारित निसर्ग संस्कृती जोपासणारा, या देशाचा मुळ मालक समाजाला जाणारा आदिवासी सातपुड्याच्या डोंगर कपारीत गुण्यागोविंदाने एकत्र श्रम संस्कार व समुहाने आपले जीवन व्यतीत करीत होता, तो आदिवासी आधुनिकीकरण व बाजारीकरणामुळे देशोधडीला लागला आहे. गावात रोजगाराचा अभाव, अल्पभूधारक शेतकरी, वनजमिनीचे प्रलंबित प्रश्न, चांगल्या शिक्षणाचा अभाव, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, शासकीय योजना राबविण्यात शासनाला आलेले अपयश, बोडका झालेला सातपुडा यामुळे लोकांना जंगलावर आधारित वस्तू व उपयोग कमी झाल्याने कधीकाळी फक्त मीठ घेणारा आदिवासी रेशनचां भात खाऊन पोट भरण्यासाठी मजबूर आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात काम करणारे अधिकारी, पुढारी, एनजीओ, व्यापारी, कारखानदार, संस्था गब्बर होत असताना आदिवासी मात्र कुपोषित होत भिकेला लागला आहे. प्रचंड जंगल असलेला सातपुडा अधिकारी व पुढाऱ्यांनी बोळका झाला आणि आदिवासींना मात्र शेतीला, प्यायला व गाईगुराना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पारंपरिक शेती उत्पादनाला हमीभाव नसणे व माळरानातल्या शेतीत उत्पन्न कमी येण्याने स्थानिक आदिवासीना जीवन जगणे मुश्कील झाले आहे.
भारतीय राज्यघटनेतील आदिवासींच्या विशेष हक्क अधिकाराला डावलून राज्य व केंद्र सरकारकडून विशेष संरक्षण कमकुवत करत नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. पाचवी सहावी अनुसूचीत आदिवासी स्वशासनाचे अधिकार संपुष्टात येऊन हे कायदे सरकार आदिवासी जमीन हिसकवण्यासाठी उद्योगपती, व्यापारी, कंत्रादार यांच्या फायद्यासाठी बदलत आहे. पेसा, वनहक्क, अट्रोसिटी कायदा, भूसंपादन व पुनर्वसन कायदे अस्तित्वात असूनही आदिवासींना सरकार व बिगर आदिवासी समाजाकडून धोका आहे. अशावेळी एक ना अनेक समस्या भेडसावत असताना सातपुड्यातील युवकांनी समाजाला जागृत करून संघटित करणे व जनचळवळ उभी करणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक रोजगार, स्थलांतर रोखणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे, स्थानिक युवकांनी सरकारी नोकरी करून शासनकर्ती जमात होणे आवश्यक आहे. कुपोषणाचा डाग पुसण्यासाठी सामाजिक प्रयत्नाची गरज आहे. म्हणून सरकारी कामातील भ्रष्टाचार रोखणे, पुढाऱ्यांनी जाब विचारणे आणि समाज हिताच्या कामाला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग एका समाज चळवळीचे शिलेदार होऊया.
अशा अनेक मुद्द्यावर आदिवासी समाज व नवयुवकांना जागृत करणे काळाची गरज आहे. त्यासाठी परिसरातील सर्व जाणकार आदिवासी समाजबांधवांनी आदिवासी जनसंवाद अभियान व उलगुलान महामेळावा, मोलगी यात मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आम्ही, सातपुड्याच्या सर्व सुशिक्षित युवक, नोकरदार, अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, बेरोजगार युवक युवती, सामाजिक संस्था व संघटना यांच्या वतीने "सातपुडा जनसंवाद यात्रा" आयोजित करीत असून आदिवासींना भेसावणाऱ्या ज्वलंत समस्या यावर मंथन करून उपाययोजना करण्यासाठी एक पाऊल पुढे येत आहोत. याद्वारे सातपुड्यातील गावपाड्यात जाऊन लोकांना आदिवासी हक्क अधिकार समजावून देत ते मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लोक चळवळ उभी करणे, स्थानिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, सरकारी नोकरी व योजनाचा योग्य लाभ घेणे, संस्कृती व समाज टिकवणे, विद्यार्थांना करिअर व व्यक्तिमत्त्व विकास विषयक मार्गदर्शन करणे साठी एकत्र येत आहेत.
या यात्रे अंतर्गत परिसरात सर्व नोकरदार, युवक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते गावपाड्यात जाऊन एक ते दोन तास मार्गदर्शन करून समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद साधणार आहे. तरी आपण सर्वांना या उपक्रमात तन मन धनाने सहभागी व्हावे, आपल्या गाव परिसरातील समाजबांधवांना एकत्र करून नव्याने आदिवासी विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी एकत्र होऊयात.
जनसंवाद यात्रा गाव बैठकीतून दिनांक १ जून ते ९ जून पर्यंत पुढीलप्रमाणे गावपाड्यावर जाऊन भेट देत सातपुडा बचावाची हाक देणार आहे.
जनसंवाद यात्रा मार्ग
दिनांक १ जून, २०२४
मोलगी, सुरगस, पिंपलखुटा, मोकस, वडफळी, बोगदा, हूनाखांब, बर्डी
३ जून २०२४
मोलगी, सरी, दहेल, मोगरा, कूवा, होराफळी, खडकापानी, तीनखुण्या
५ जून २०२४
मोलगी, भगदरी, पिंप्रापाणी, जामली, सल्लीबार, जमाना, दाब
७ जून २०२४
मोलगी, खुंतामोडी, कात्री, सोन बू. धडगाव, बिजरी, काकरपती, कलिबेल
"९ जून २०२४*, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा शहादत दिवस निम्मित मोलगी येथे देशभरातील आदिवासी युवा नेतृत्वाला बोलावून
"आदिवासी युवा उलगुलान महामेळावा, मोलगी" करून आदिवासी जनसंवाद यात्रा समापन करणार आहे.
आयोजक
सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ, मोलगी, अंधश्रध्दा निर्मुलन समिती सातपुडा, जोहार फाउंडेशन व इतर आदिवासी सामाजिक संघटना
संपर्क - डॉ. कैलास वसावे, 9405372708/8080136606 ऍड . गजमल वसावे 9420724420, ऍड. जितेंद्र वसावे 8767098140,
नक्की सहभागी व्हा....
जोहार, जय आदिवासी...!!

Пікірлер: 29
@bharatvasave3699
@bharatvasave3699 Ай бұрын
खूप छान आहे हा उपक्रम सर्व आदिवासी बांधवांनी सहभागी झाले पाहिजे
@Tribalmusicclub2766
@Tribalmusicclub2766 2 ай бұрын
तुमच्या भागात हुंडा कमी होत नाही.वकील साहेब. धडगाव तालुक्यात कमी केलं आहे.
@sureshvasave0156
@sureshvasave0156 2 ай бұрын
खोट बोलू नका
@Patle_Mangesh_Official
@Patle_Mangesh_Official 2 ай бұрын
खर ना 51000 हजार दहेज केलं आहे
@rameshpawra4132
@rameshpawra4132 2 ай бұрын
खुप छान उपक्रम...असे उपक्रम सर्व आदिवारी बहुल क्षेत्रात व्हायला हवे.
@the__ravindra___vlv_
@the__ravindra___vlv_ 2 ай бұрын
समाज च्या सांगला विचार करणारा तु खर माणूस आहे वकील दादा 🙏💪 जय आदिवासी जय जोहार 🙏🙏
@santoshpawarabhanolikar2064
@santoshpawarabhanolikar2064 2 ай бұрын
Good work 👍
@rakeshpadvi7261
@rakeshpadvi7261 2 ай бұрын
👍 सामाजिक जनजागृती करणे खुप गरजेचे आहेत... खूप छान कार्यक्रम हाती घेतला आहेत... सातपुड्यातील प्रत्येक नागरिकांची(सुशिक्षित )जबाबदारी आहेत.... आपल्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या..... Great work Ad. Dr. Kailas vasave sir and Team.
@user-tz6cu3kq9i
@user-tz6cu3kq9i 2 ай бұрын
Very good vokil saheb
@mangalsingpatil9619
@mangalsingpatil9619 2 ай бұрын
जनसंवाद अभियान हा सातपुड्यातील दुर्गम भागातील आपल्या आदिवासी समाजाचा अस्तित्वावर चर्चा होणार आहे. म्हणून ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा. खूपच छान कार्यक्रम आयोजन केला आहे. कैलासदादा
@Gaju-padvi-editor
@Gaju-padvi-editor 2 ай бұрын
छान विषय आहे माझ्या कडुन फुल सपोर्ट 👍👍👍👍👍
@kuwarparadke7155
@kuwarparadke7155 2 ай бұрын
वकील साहेब आपण खूप मेहनत घेत आहात समाजासाठी.....
@medicallabtechnologistrahu1865
@medicallabtechnologistrahu1865 2 ай бұрын
जय आदिवासी.
@padviratan7094
@padviratan7094 2 ай бұрын
छान विचार वकील साहेब
@mungsajidakhore3206
@mungsajidakhore3206 2 ай бұрын
Khup cchan Doctor saheb
@niranjanavasave7764
@niranjanavasave7764 2 ай бұрын
Weldone Kailasbhai, Great Job,Hats off u👏
@acdilipbhai5514
@acdilipbhai5514 2 ай бұрын
Aaplya Akkalkulkuwa bhagat hunda komi hot nahi tyacha baddal pan charcha kara
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 2 ай бұрын
धडगाव चे नेते दहेज कमी करू शकतात पण मोलगी चे नेते दहेज कमी करू शकत नाही
@magansingpadvi6039
@magansingpadvi6039 2 ай бұрын
खूप छान लिहलं आहे सर 👍
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 2 ай бұрын
नोकर भरतीत बोगस आदिवासी लागत आहे त्यावर पण बोला साहेब का फक्त अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचा विचार करून राजकारणा पुरता प्रचार करणार का ? का तुम्ही पण फक्त विधानसभेचा विचार करून प्रचार सुरू केला ? शिक्षक भरती फार मोठ्या प्रमाणावर बोगस आदिवासी लागेल आहे फक्त अक्कलकुवा धडगाव मतदारसंघा चा विचार न करता पुर्ण महाराष्ट्राचा विचार करावा
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 2 ай бұрын
आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. हे विषय आमच्या जनसंवाद अभियान दरम्यान आम्ही चर्चा करणार आहोत. फक्त सोशल मीडिया वर दरवेळी चुका शोधण्यापेक्षा आमच्या बरोबर या फिल्डवर..! पेसा भरती, बोगस, रोस्टर, विशेष पदभरती अशा अनेक विषयावर आपण काम करूयात. राहिला विषय राजकारणाचा, ते मी केव्हाच सोडले आहे..
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 2 ай бұрын
@@Prof_Kailas_Vasave नक्कीच सर कारण आम्हाला तुमच्या कडून फार अपेक्षा आहे आपली कधीच भेट झाली नाही पण तुमची समाजासाठी तळमळ पाहून मनापासून अभिनंदन तुमच्या सारखे नेतृत्व मुंबई च्या विधानभवनात असावे ही आमच्या आदिवासी युवकाची अपेक्षा आहे
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 2 ай бұрын
@@Prof_Kailas_Vasave अँड कैलास वसावे हे नाव धडगाव तालुक्यातही तेवढच लोकप्रिय आहे जेवढ मोलगीत आहे
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 2 ай бұрын
​​@@Prof_Kailas_Vasave माझा हेतु तुम्हाला कमी लेखण्याचा नव्हता पण तुम्ही आपल्या आदिवासी लोकांनसाठी लढता म्हणून तुमच्या कडून अपेक्षा आहे वरिल विषयावर चर्चा कराल कारण आपल्या समाजात नेतृत्वाची कमतरता आहे समाजासाठी लढणारे नेते नाही तुम्हीच आमचे नेते तुम्हीच आदिवासी युवकाचे आधार जय जोहार जय आदिवासी
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 2 ай бұрын
समजासाठीची तळमळ आमच्या रक्तात आहे. समाजविरोधात असलेल्या शक्तीची लढणे आम्ही आश्रम शाळेत असल्यापासून करीत आहे. त्या साठी आम्ही पोलिसांच्या लाठ्या पण झेलल्यात, कलेक्टरच्या गाड्या पण फोडल्यात, अंगावर केसेस घेतल्यात. तुमचे प्रश्न तेवढेच बेधडक व रोकठोक असतात पण मला वाटते परंतु हे प्रश्न तुम्ही विद्यमान आमदार खासदार, ZP PS मेंबर व इतर जबाबदार घटकांना देखील विचारावे असे मला वाटते. बाकी आपण सर्वकाही जाणताच..
@SankitEnterprises
@SankitEnterprises Ай бұрын
Contect number patva me Umarkuwa chha ahe
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave Ай бұрын
Dr. Kailas Vasave 9405372708 8080136606
@SankitEnterprises
@SankitEnterprises Ай бұрын
@@Prof_Kailas_Vasave Tai hoti amchha gav chhi ahe
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 93 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН