No video

विठ्ठलाला गोपीचंदनच का ? । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे । KirtanVishwa | Vitthal Kirtan

  Рет қаралды 84,005

KirtanVishwa

KirtanVishwa

2 жыл бұрын

विठ्ठलाला गोपीचंदनच का ?
नारदीय कीर्तन । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे
#marathikirtan
आपण अभंगांमध्ये, स्तोत्रांमध्ये भगवंताच्या रूपाचे वर्णन नेहमी करतो. गणपतीबाप्पांचे वर्णन करताना आपण म्हणतो; “रत्नखचित फरा तुज गौरिकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा.” गणपतीला रक्तचंदनाची उटी लावलेली आहे असे वर्णन आपण करतो पण गोपालकृष्णाला मात्र गोपीचंदनाची उटी लावली आहे; असे म्हणतो. पण चंदनाच्या लेपाला गोपीचंदन हे नाव कसे आले? याचा उलगडा हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे आपल्या कीर्तनातून करणार आहेत. तर ऐकुया हे हरिदासी कीर्तन.
Rohini Tai Paranjape kirtan
Vitthal Rukmai
Gopichandan
Pandharpur Wari
Pant Maharaj Balekundri Abhang
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Пікірлер: 372
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 2 жыл бұрын
अतिशय सुरेख आणि भावपूर्ण कीर्तन, गोपींची अवर्णनीय भक्ती ऐकून अक्षरशः अश्रू दाटले. ताई खूप छान सादरीकरण केले. पंत महाराजांचा अभंग व त्याला साजेसा उत्तर रंग, खूप छान. सर्व पदे अतिशय सुरेख रीतीने आपण गायली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@yoginiborgaonkar6958
@yoginiborgaonkar6958 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, डोळ्यातून अश्रू वाहतात असे कथनक आणि कीर्तन रंगवण्याची खुबी ताईंकडे आहे. अप्रतिम 🙏🏻
@neetapurandare5599
@neetapurandare5599 Жыл бұрын
रोहिणीताई कीर्तन, गायन, आख्यान सर्वच अप्रतिम🙏🙏आपले मानावे तेव्हढे आभार थोडेच🙏🙏अशा स्वर्गीय कीर्तनाचा आनंद अनुभवता आला.ताई खूप खूप धन्यवाद🙏🙏
@suvarnabhagwat-cb6xq
@suvarnabhagwat-cb6xq 6 ай бұрын
हे किर्तन अप्रतिम खर्च रोहिणी ताई गाणी व प्रवचन हि खूप खूप छान
@priyakulkarni6073
@priyakulkarni6073 24 күн бұрын
खूपच सुंदर कीर्तन सर्वानाच आवडेल असे आहे
@geetashinde3759
@geetashinde3759 2 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏 खरच खूप खूप धन्यवाद ताई तुमचे अभार मानावे तेवढे कमीच होतील प्रेमाचा खरा अर्थ तुम्ही सांगितला कीर्तनातील एक एक शब्द हदयाला स्पर्श करून गेला 👌👌👌👌 🙏🙏
@audumbarwaghe2786
@audumbarwaghe2786 Жыл бұрын
Kirtan uttam aahe man prasann aanandi
@mayurathosar8771
@mayurathosar8771 2 ай бұрын
खूप खूप छान कीर्तन आहे ताई, भक्ती जागृत झाली, अंतक्करण शुद्ध झाले🙏🙏
@bgmixpro1749
@bgmixpro1749 3 ай бұрын
ऐशि प्रेमाची या जाति...करि लाभाविन प्रिति...खूप सुंदर कीर्तन..रोहिणी ताई खरच ऐक पुन्यात्मा आहेत...काय सुन्दर आवाज आहे...जिवना मध्ये कधि तरि समोर कीर्तन आईकन्याचा योग यावा...ऐवढी ऐकच ईच्छा...
@advaitoak5935
@advaitoak5935 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन ताई आता नवीन शब्द बोलायला नाहित हो भारावून गेले आहे आता तुमची ही सर्व कीर्तने सतत ऐकून तेच मनन चिंतन करणार कालची तुमची आफळे बुवानी घेतलेली मुलाखतही फ़ार आवडली कीर्तन क्षेत्रातील पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा कीर्तन उप्क्रमास सुद्धा खूप शुभेच्छा आम्हाला अशीच कीर्तन सतत ऐकायला मिळोत ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@aniltarkunde7632
@aniltarkunde7632 2 жыл бұрын
Apratim. Can't describe in words. Eyes were watering. Will like to listen more from Rohinitai. All the best to her.
@hemalatamhatre5869
@hemalatamhatre5869 2 жыл бұрын
@@aniltarkunde7632.
@dinkarjoshi7296
@dinkarjoshi7296 2 жыл бұрын
अतिशय होते किर्तन.हरी ओम.
@nilimanilima30
@nilimanilima30 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन
@ananddedhe2945
@ananddedhe2945 Жыл бұрын
शब्दांच्या पलीकडे 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
@namdeosawant6778
@namdeosawant6778 Жыл бұрын
अतिशय श्रवणीय कीर्तन. ताईचं सादरीकरण माऊलीच्या मायेने ऐकवलं. डोळ्यातून पाणी वाहत होतं, खूप छान.. कीर्तन संपऊच नये असं वाटत होतं. 👌👌👌💐🙏🙏🙏👍👌💐💐👌💐
@AnjaliDeo-hy9fx
@AnjaliDeo-hy9fx Ай бұрын
अप्रतिम कीर्तन. ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणीच आल❤
@sanabgavji9030
@sanabgavji9030 11 ай бұрын
खरोखरच किती वेळेस ऐकावं असं वाटतं.खुपच सुंदर.पाठांतर आश्चर्यकारक आहे.वाणी रसाळ, सहकारी सर्वच सुंदर शब्दच नाहीत, कौतुक करण्यासाठी.
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 жыл бұрын
हे आख्यान किती ऐकलं तरी याची अवीट गोडी तितक्या पटींनी वाढतच आहे. धन्यवाद रामा या आनंद-दानाला! शतशः धन्यवाद! आणि अनेकानेक शुभेच्छा! जय श्रीराम!
@user-fm9kn9zh8r
@user-fm9kn9zh8r 2 жыл бұрын
खूप छान
@sach9805
@sach9805 Жыл бұрын
धन्यवाद रोहीनिताई अवीट गोड कीर्तन शतशः धन्यवाद
@omkarkashid7152
@omkarkashid7152 Жыл бұрын
खूपच सुंदर रोहिणी ताई
@shrikrishnathorhate5494
@shrikrishnathorhate5494 Жыл бұрын
M free de Al ne😂 by mi
@jaganathmhatre3595
@jaganathmhatre3595 Жыл бұрын
Y
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 2 жыл бұрын
अप्रतिम किर्तन 🙏 खरंच खूप छान 👌👌👌🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
जय श्रीराम!सौ.रोहिणी ताई,कीर्तन खूपच हृदयस्पर्शी आहे.गोपी यांच्या कृष्णभक्तीला आमचे त्रिवार वंदन!खूपच सुंदर!👌💐👌
@arunkulkarni6870
@arunkulkarni6870 2 жыл бұрын
अतिशय सुंंदर व श्रवणीय कीर्तन ! मधुर आवाजात पदे ऐकतांना मन भारावून जाते व ब्रह्मानंद होतो ! पुनःपुन्हा ऐकावे व आनंद घ्यावा , हेच खरे ! !
@User38297
@User38297 11 ай бұрын
अतिशय सुंदर कीर्तन 👌👌कितीही ऐकलं तरीही मन भरत नाही . अप्रतिम...👍👍
@rekhajoshi5219
@rekhajoshi5219 2 жыл бұрын
अप्रतिम हृदयस्पर्शी कीर्तन रोहिणीताई! त्यातील पदेही अर्थपूर्ण व सुरेल आवाजात तुम्ही म्हटलीत. भगवंत च जणू तुम्हाला बळ देत आहे व कीर्तनरूपी संस्कार श्रोत्यांवर तुमच्याकरवी करून घेत आहे. अशीच पुढील आपली कीर्तने आम्हास ऐकण्यास मिळोत. श्री पंत महाराज की जय!🙏 ... रेखा जोशी...
@sakshijanhvigitgunjan4890
@sakshijanhvigitgunjan4890 3 ай бұрын
व्वा! शब्दच अपुरे! स्वर्गानंद, टाळ वादन,गायन अप्रतिम , भारावून गेलो
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Жыл бұрын
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन ऐकून आनंद होतो एकतच रह वाटते दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली
@bhalchandrasathe807
@bhalchandrasathe807 2 жыл бұрын
खूपच छान, श्रवणीय कीर्तन,गायन आणि उत्तम सादरीकरण,सौ.रोहिणीताईंचे खास अभिनंदन,नमस्कार.
@vasantjoshi4536
@vasantjoshi4536 15 күн бұрын
किर्तन फारच सुंदर,शब्द अपुरे पडतात.
@bharatijadhav69
@bharatijadhav69 2 жыл бұрын
खूपच सुंदर भक्तीप्रेम भावपूर्ण किर्तन धन्यवाद
@vilaskarve6123
@vilaskarve6123 2 жыл бұрын
सौ रोहिणी ताई, आपल्या कीर्तनात आपण हे अतिशय गोड मधुरा भक्ती वर्णन करणारे चरित्र आख्यान अनेक वेळा सांगितले आहे.. आम्ही ऐकलेही आहे. परंतू तरीही प्रत्येक वेळी, ते प्रथमच ऐकत असल्याचा आनंद प्राप्त होतो... खूप छान..🙏
@vilasgarud3300
@vilasgarud3300 5 ай бұрын
अतिशय सुंदर किर्तन, 🙏🙏🙏
@vandanaphadke2205
@vandanaphadke2205 2 жыл бұрын
अप्रतिम. केवढे हे प्रेम! त्या प्रेमात न्हाऊन आम्हीही धन्य झालो.आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे आपणां सर्वांना शतशः नमन व धन्यवाद
@chandrashekharpathak6768
@chandrashekharpathak6768 2 жыл бұрын
रोहिणी ताई फार अप्रतिम किर्तन झाले . आपल्या मधुर वाणीने हा भगवदभक्तीचा भाव आमच्या ह्यदयापर्यत पोहचता . सर्वांचे धन्यवाद
@vaibhavfulkar7070
@vaibhavfulkar7070 2 жыл бұрын
Brilliant illustrations of love and the way last scene with Shree Krishna, Narada Muni and Gopika was narrated was fabulous 👌
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 2 жыл бұрын
खुप सुंदर कीर्तन झाले. अनेक वेळा हे गोपी-चंदनाचे ऐकले आहे. तथापी रोहिणीताईनी हे कथानक उत्कृष्ट पणे सादर केले; वेगळाच निर्मळ भक्तीरस प्रस्तुत कीर्तनात जाणवला. Cent per cent marks. 👌 ह.भ.प.चारूदत्त आफळे बुवांनी ताईंची घेतलेली मुलाखत ऐकली. वारकरी पठडीचे कीर्तन सुध्दा करण्याचा ताईंचा विचार आहे हे ऐकून चांगल वाटले. तेंव्हा वारकरी पध्दतीचे कीर्तन ताईंनी जरूर, या विश्व कीर्तन प्रकल्पात, सादर केलं तर खूप आवडेल. संयोजकांना तशी नम्र विनंती. सर्व संबंधितानां नमस्कार आणि हरि: ॐ ॥ जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ॥ 💐🌺🌼🌸💐👏👏👏
@prakashsagavekar4918
@prakashsagavekar4918 Жыл бұрын
रोहिणी ताईंचे किर्तन खूप सुदंर भाषा शैली खुप सुदंर आहे, ऐकत राहावी अशी वाटते धन्यवाद!
@user-oh9vl6yc9e
@user-oh9vl6yc9e 9 ай бұрын
Wah !! Apratim sadarikaran.Sweet voice.Khoop Sunder.Man trupta Zale. Rohinitai Dhanyawad.
@dattarambhosale1857
@dattarambhosale1857 5 ай бұрын
ह भ प. रोहिणीताई परांजपे यांचे कुठलही कीर्तन प्रवचन ऐकतच राहावे असे वाटते. गोड आवाज मधुर वाणी यामुळे कीर्तनाला रंगत येते कान तृप्त होतात.
@vandanapatil5316
@vandanapatil5316 Жыл бұрын
खूपच सुंदर ताई मन प्रसन्न झाले आहे
@ravindrakadake5540
@ravindrakadake5540 Жыл бұрын
अप्रतिम ताई आपल्या स्वर गायनातून स्वर्ग सुख आणि भगवद भक्ती म्हणजे गोपींचे कृष्णावरचे प्रेम अतिशय आनंद देणारे आहे. कीर्तन विश्वाचा हा प्रकल्प सुरू राहो.
@sandhyabade2050
@sandhyabade2050 9 ай бұрын
अप्रतिम.शब्दच अपुरे कौतुक करायला..रोज 1 कीर्तन ऐकते.सगळे छान करतात.🙏🙏
@shobhanannaware2615
@shobhanannaware2615 Жыл бұрын
खुपच गोड आवाज ताई अगदी मंत्रमुग्ध करणारा
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 10 ай бұрын
हे कीर्तन अखिल विश्वात दुमदुमत राहो ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो 🙏❤️🙏🏳️‍🌈🏳️‍🌈
@manseepawar5748
@manseepawar5748 Жыл бұрын
अप्रतिम रोहिणी ताई...भाव तेथे देव...तुमच्या भाव दर्शविला अणि आम्हाला कृष्ण दर्शन झाले..द्वारका दिसली गोपी दिसल्या...🙏
@sopankandhare6403
@sopankandhare6403 2 ай бұрын
खूप छान महाराजचे किरतण
@mayakale9599
@mayakale9599 2 жыл бұрын
श्री राम समर्थ 🙏🙏 गोपींची अप्रतिम कृष्ण भक्ती गोपीचंदन.अप्रतिम किर्तन.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@namdeosawant6778
@namdeosawant6778 Жыл бұрын
खूप.. छान. शब्द अपुरे पडतील. मी खूप वेळा हे कीर्तन ऐकीयेले आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतेय. 🙏👍👌🌷🌹💐💐💐
@girijasavarkar4098
@girijasavarkar4098 2 жыл бұрын
रोहिणी अप्रतिम कीर्तन शब्दच नाहीत काही बोलायला अति अति सुंदर
@ashokghorpade4456
@ashokghorpade4456 Жыл бұрын
किती अप्रतिम........ किती सुंदर....... खरच अध्यात्म चा.... कीर्तन जय हरी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shirishjoshi6962
@shirishjoshi6962 Жыл бұрын
अप्रतिम हृदयस्पर्शी कीर्तन
@PadmaAbdagiri-je1hx
@PadmaAbdagiri-je1hx 4 ай бұрын
.खुप सुंदर आहे नवीन शिकायला मिळाले
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन!ऐकतच रहावं वाटतं होतं
@user-oe6zm9pl9i
@user-oe6zm9pl9i 5 ай бұрын
अत्यन्त उत्कृष्ट किर्तन आहे
@avinashthakare8998
@avinashthakare8998 2 жыл бұрын
खुप छान किर्तन आनंद वाटला एकून
@manikkulkarni1528
@manikkulkarni1528 Жыл бұрын
अप्रतीम सादरीकरण.गायनकला अतिशय सुंदर व मधुर.
@smitamadan7631
@smitamadan7631 Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@dattajiraoyadav580
@dattajiraoyadav580 Жыл бұрын
अप्रतिम ताई अप्रतिम एक सुंदर प्रेम या शब्दावर निरूपम ऐकण्याचा आनंद मिळाला धन्यवाद
@anilshelke6268
@anilshelke6268 4 ай бұрын
असे किर्तन आतापर्यंत ऐकलेच नाही. अप्रतिम ह्रदय भरुन आले.
@sunandasawant5480
@sunandasawant5480 Ай бұрын
खूपच सुंदर कीर्तन ❤
@pramodgijare925
@pramodgijare925 2 жыл бұрын
🙏🙏 अप्रतिम आख्यान जय जय रघुवीर समर्थ
@sanjivkokil4169
@sanjivkokil4169 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 🙏🙏 डोळ्यात पाणी आणलं हो.....! 🙏🙏
@jitendrawagh8607
@jitendrawagh8607 Жыл бұрын
अप्रतिम उत्कृष्ट 💐राम कृष्ण हरी 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunilthombre1067
@sunilthombre1067 Жыл бұрын
खुब छान कीर्तन ताई
@ameyabhyankar4944
@ameyabhyankar4944 8 ай бұрын
खूपच भक्तीपूर्ण आनंदाश्रू वाहतात 🌹🌹🌹🙏
@vishakhajoshi4423
@vishakhajoshi4423 2 жыл бұрын
वा रोहिणी ताई अतिशय उत्तम कीर्तन सेवा
@dhanashripandit6549
@dhanashripandit6549 24 күн бұрын
खूपच चागले वाटले डोळ्यातून पाणी आले
@madhurijoshi195
@madhurijoshi195 Жыл бұрын
अप्रतिम धन्य ती कृष्णभक्ती.
@user-sv7yj4tc4o
@user-sv7yj4tc4o 2 ай бұрын
हार्दिक अभिनंदन ताई वाटचालीस शुभेच्छा
@madhuraprabhu9168
@madhuraprabhu9168 2 жыл бұрын
आमोघ वाणी आणि गंधर्वतुल्य स्वराचा अपूर्व संगम ! अंतःकरणात खळखळणारा भक्तीचा झरा शब्दागणिक दिसून येतो रोहिणी ताई ! जसं मन तसं कीर्तन ! गोड, शुध्द, सात्विक, निर्मळ, भक्तीमय !
@shamalkulkarni6624
@shamalkulkarni6624 24 күн бұрын
व्वा..अप्रतिम..shravniy
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r 4 ай бұрын
भक्ती आणि ज्ञानाची सुरेख पर्वणी. गोपीच्या भक्तीचा एक कण देखील आम्हाला मिळाला तर स्वतःला धन्य मानू. धन्य त्या गोपी आणि धन्य तो श्रीकृष्ण.
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌ऐकतच रहावं असं वाटत.
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 2 жыл бұрын
खूपच छान झाले कीर्तन 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sadhanahalbe7547
@sadhanahalbe7547 4 ай бұрын
अप्रतीम कीर्तन खूप सुंदर
@rohinishinde3704
@rohinishinde3704 7 ай бұрын
खुप खुप छान .... अगदी डोळ्यातून अॠ आले गोपिका प्रेम ऐकुन ... भावा विन भक्ति कैसी
@suhasarondekar3899
@suhasarondekar3899 2 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम, व्यक्त करायला शब्दच नाहीत. नेहमीच ऐकायला मीळो. अनेक अनेक शुभ आशीर्वाद.
@nishapunde5592
@nishapunde5592 2 жыл бұрын
Atishay Sundar nirupan kitihi aiekale Tari dar veles navinch vatate Rohinitaimche susravya nurupan aiekatach rahave se ahe Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche
@prakashabhyankar6780
@prakashabhyankar6780 2 жыл бұрын
अतिशय सुंदर .साथही उत्तम.
@eknathsawant4136
@eknathsawant4136 9 ай бұрын
अतिसुंदर कीर्तन
@bhaktidabir1059
@bhaktidabir1059 Жыл бұрын
खूपच सुंदर किर्तन
@devalonar6960
@devalonar6960 Жыл бұрын
🙏 खूप छान. तुम्ही KZfaq वर upload करून जगभरात घरी बसल्या किर्तन ऐकण्याचा आनंद मिळवून दिला, रोहिणी ताईच्या मुखात प्रत्यक्ष सरस्वती आहे...आज मी हे California USA मधे ऐकले.
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 2 жыл бұрын
रोहिणी ताई, अप्रतीम सादरीकरण. पूर्वरंग खूपच छान, निरुपणासाठी घेतलेला अभंग खूपच छान. आणि उत्तररंगाने तर चार चांदच लावले. गायनाच्या बाबतीत तर मी एवढेच म्हणेन परमेश्वराची आपल्यावर नि:सीम क्रुपा आहे. खरोखर आपल कीर्तन ऐकून कान तृप्त झाले. आपल्याला आणि कीर्तन विष्वला, आदरणीय चारुदत्तबुवा आफळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद. 🌹🙏🙏🙏🙏🌹
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 2 жыл бұрын
🙏🙏
@bhaudhaygude4926
@bhaudhaygude4926 Жыл бұрын
खुप अप्रतिम कीर्तन,ताई🙏🌼
@kavitashelar9423
@kavitashelar9423 11 күн бұрын
अप्रतिम
@kanchansamant900
@kanchansamant900 8 ай бұрын
अनेक वेळा ऐकून ही तृप्ती होत नाही. केवळ अलौकिक! रोहिणी ताई खूप खूप धन्यवाद 🙏
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@mahadevpatil1782
@mahadevpatil1782 2 жыл бұрын
खुप खुप छान सुंदर आणि🙏🙏🙏🙏
@smitavjadhav7527
@smitavjadhav7527 5 ай бұрын
गोपाल कृष्ण हरी गोविन्द गोकुळ गोपींची भक्ती सादर केली धन्य वंदन ताई सप्रेम नमस्कार तुम्हाला💐🙏
@SulakhePrashant
@SulakhePrashant 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून देणाराचे खूप खूप आभार
@blackthunder3137
@blackthunder3137 Жыл бұрын
अप्रतिम या किर्तनाला तोडच नाही परांजपे ताई साक्षात सरस्वती आहात आपण अप्रतिम धन्यवाद
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 Жыл бұрын
Ramesh vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup khup chhan apratim margadrshan dhanyavad Rohini Tai aamchekadun khup khup shubecch
@umakurade9436
@umakurade9436 Жыл бұрын
Atishay sundar kirtan yaiknyacha yog kirtan vishwa chya madhyamatun aaj ala,aajachi sakal dhanya zali, rohini Tai yana shatasha dhanyavad.
@neelaphatale7923
@neelaphatale7923 Жыл бұрын
ताई तुमच कीर्तन म्हणजे फार मोठी मेजवानी आहे हो.शब्दात काय आणि कस वर्णन करू समजत नाही .तुमची अशीच कीर्तन आम्हाला ऐकायला मिळावी हीच प्रार्थना नीला फटाले .परळी वैजनाथ
@suchetavaze2657
@suchetavaze2657 Жыл бұрын
आ. रोहीणीताई.... सध्या मी फक्त आपलीच किर्तन यू ट्यूबवर ऐकते एकदा एक किर्तन ऐकून समाधानच होत नाही. तुमचा व्यासंग.. पाठांतर , मधुर आवाज गाण्यातील विविधता सर्वच आकर्षक आहे आपला घरोघरी किर्तन . पोहचवायचे ध्येय त्यातून समाज सुधारणा व्हावी ही अपेक्षा निश्चित पूर्ण होईल हा राजमार्ग आहे..
@user-bn7pk4xh4f
@user-bn7pk4xh4f 3 ай бұрын
खूप छान. किर्ती ऐकायला तुमचं खूप आवडतं 🎉🎉 खूप खूप नमस्कार 🎉🎉
@ashoklole7077
@ashoklole7077 Жыл бұрын
उत्तोत्तम कीर्तन, उच्च विचार अभ्यासपूर्ण, ऐकुशीच वाटते, पण मध्ये आपली की क्लिप येते ते खटकते कारण त्यात बाकी काही माहिती किंवा उपक्रम राबविता हे कळत नाही, असो .. अप्रतिम ❤️👍🙏
@nilamsawale920
@nilamsawale920 2 жыл бұрын
नमस्कार , खरच तुम्ही नारादीय गादीचे सुंदर पाईक आहात, 💐 आपणही त्या वेळच्या गोकुळात वावरतोय असे तुमच्या किर्तनामुळे वाटले. प्रेमाश्रूंची माळ त्या भगवंता चरणी तुमच्यामुळे वाहता आली. अशीच किर्तनसेवा घडत राहो.
@balasahebsurvase3906
@balasahebsurvase3906 9 ай бұрын
अप्रतिम किर्तन प्रवचन ❤❤
@manasipawar7712
@manasipawar7712 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन.
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 2 жыл бұрын
ऐसे प्रेमाची ही जाती. 👌🌹🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 ай бұрын
Very nice Kirtan, Tai.jai ho!🙏
@vrindakallianpur6048
@vrindakallianpur6048 Жыл бұрын
Aprateem, Atisundar, khoop chaan!! 🙏🙏
@vaibhavjoshi4916
@vaibhavjoshi4916 2 жыл бұрын
ह.भ. प. रोहिणी ताई परांजपे ह्यांची योग्य मांडणी आणि आवश्यक तितकंच गाणं ह्या व्यतिरिक्त काय बोलणार.म त्यांचे कीर्तन ऐकताना प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो... आणि खूप भरून येत... केवळ अप्रतिम मी ताईंना साथ केली आहे त्यामुळे मला माहीत आहे
@mrcool3405
@mrcool3405 10 ай бұрын
Om Shree Swami samartha 🌺🙏 khup chaan
@uttamgomsale938
@uttamgomsale938 Жыл бұрын
खरच सुंदर किर्तन ताई
@vandanajoshi7261
@vandanajoshi7261 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन सेवा जय हरी माऊली
@ramdeshpande5721
@ramdeshpande5721 Жыл бұрын
Pranam JaiShrikrishna.Apratim kirtan.
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 43 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 127 МЛН
Rohini paranjpe kirtan at nagapur(manmad)  part 1
1:00:03
रोहिणी परांजपे official 🚩🕉️
Рет қаралды 70 М.
पसायदान 03 | शीण कां होतो | Namdev Shastri
39:13
Namdev Shastri Official
Рет қаралды 125 М.
H.B.P. Su.Shri Rohini Mane | Kirtan | Akhil Bhartiya Nardiya Kirtan Mahotsav
1:07:20
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 43 МЛН