कागदावर चालणारी मणीबेली, अक्कलकुवा ZP शाळा, वर्गात गुराचा चारा, शिक्षणाचे विदारक वास्तव

  Рет қаралды 3,993

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

Ай бұрын

दिनांक २८ जून, २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा मणीबेली येथे भेट दिली असता शाळा बंद आढळली पहिली ते सातवीपर्यंत शाळा असलेल्या या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहे परंतु सदर दिवशी कोणताही कर्मचारी शाळेवर उपस्थित नव्हता व शाळेत एकी विद्यार्थी उपस्थित नव्हता. शाळेची पाहणी केली असता शाळेत गुरांसाठी चारा भरून ठेवला होता व शाळेचे सामान जमीनीवर पडून होते. शाळेच्या घरात खाट होती आणि वर्गात कपडे सुकवयाला टाकले होते. मणीबेली जिल्हा परिषद शाळा ही फक्त कागदावर चालत असल्याचे दिसून आले. ही शाळा फक्त कागदावर चालते आणि कर्मचारी शाळेत येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर याचा खूप गंभीर परिणाम होत असून आदिवासी विद्यार्थी शिक्षणास वंचित आहे. हे बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या मूलभूत हक्क अधिकाराचे उल्लंघन असून शिक्षण हक्क कायदा 2009 चे तीव्र उल्लंघन आहे यामुळे प्रशासनाने सदर शिक्षकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

Пікірлер: 19
@nileshvasave4195
@nileshvasave4195 Ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यातले आमदार खासदार कुठे झोपले आहेत... त्यांना कळत नाहीं का आदिवासींची ही अवस्था पाहून.... आदिवासीं चा एकच योद्धा ऍड प्रा. डॉ. कैलास वसावे
@vilaspawara1859
@vilaspawara1859 Ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम आपण समाजाला प्रकाशित करण्यासाठी व ग्रामीण परिस्थीती दाखवत आहे.. यांच्यावर काय परिणाम होतो आहे हे येथील राजकारणी लोकांना काही घेणेदेणे नाही.
@Bhagwatkasdekar0901
@Bhagwatkasdekar0901 Ай бұрын
👍👍👍
@RakeshPawara-rm4yi
@RakeshPawara-rm4yi Ай бұрын
त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांवर ती तात्काळ कारवाई करण्यात यावी... आदिवासी आमदार, खासदार, स्वतःला नंदुरबार चे शिल्पकार समजणारे आदिवासी विकास मंत्री यांना कधी जाग येणार....
@madan8759
@madan8759 Ай бұрын
सर तुमच्या कार्याला खूप खूप धन्यवाद
@dautkhatadvi9063
@dautkhatadvi9063 Ай бұрын
प्रा.डाॅ.कैलास वसावे साहेब,आपला हा उपक्रम मला खूपच छान आवडतं आहे.शासकीय शाळा/जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काय चाललेले आहे हे वास्तव चित्रण करून जगापुढे दाखवून शासनाचे पितळ उघडे पाडण्याच चांगलं काम करीत आहात.आपण व आपल्या पुर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन.❤🎉
@niranjanavasave7764
@niranjanavasave7764 Ай бұрын
CM ani PM sathi 1 daymadhe Helipad ani Road hovu shakto tar ZP.school Building tayar karne kahi kathin nahi but strictly follow up ghyava lagel
@pravinvasave6595
@pravinvasave6595 Ай бұрын
हा व्हिडीओ खूप शेअर करा.
@Gaju-padvi-editor
@Gaju-padvi-editor Ай бұрын
जाहीर खुलासा
@Ramkabai
@Ramkabai Ай бұрын
K c padvi saheb 35 varsh pausun aahe kahi apeksha
@jyotiajaytadvi3958
@jyotiajaytadvi3958 Ай бұрын
Molgi RH मध्ये महिला वाड महिला ना बाथरू मध्ये जायला पाणी काय बाथरूम band आहे मी माझ्या पत्नीला डिलीवरी साठी घेऊन गेलो होतो पण स्तनदा मातेच्या कपडे कुठे धुणार हात पाय कुठे एवढी खराब परिस्तिथी आहे मला पूर्ण एका दिवसात सुट्टी घ्यावा लागली कैलास दादा तुम्ही एकदा भेट द्या mulgi RH ला
@Gautampawara02
@Gautampawara02 Ай бұрын
सर तुम्ही माझ्या गावाला पण या एकदा.....😢
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave Ай бұрын
कोणते गाव आहे तुमचे? नक्की येईन किंवा माझ्या टीम पैकी कोणीतरी येईल..!!
@Gautampawara02
@Gautampawara02 Ай бұрын
@@Prof_Kailas_Vasave धजापाणी ता. तळोदा जि. नंदुरबार आदरणीय सर 1979 पासून वसलेलं हे माझं गाव, गावात जि. प. शाळा आहे परंतु इमारत किंवा शाळेसाठी कुठलही शेळ नाही. असं असताना विद्यार्थी तरी काय शाळेत मन लावून शिक्षण घेतील? आणि गाव डोंगराळ भागात असल्यामुळे शिक्षकही कधी कधी दांड्या मारत असतात..... म्हणून माझी आपणांस विनंती आहे की माझ्या गावा सारख्या अशा अनेक गावात शाळा नसल्याने फार मोठे नुकसान आपल्या समाजाचं होतांना दिसून येत आहे, यावर प्रशासनाने लक्ष द्यावे यासाठी प्रयत्न करावे.... 🙏🏻☺️🙏🏻
@satishthakare9223
@satishthakare9223 Ай бұрын
म्हणूनच पेसा भरती होणे गरजेचे आहे स्थानिक शिक्षक रोज त्या शाळेवर शिकवण्यासाठी जाईल
@dilipraut5250
@dilipraut5250 21 күн бұрын
दादा तुमचा मोबाईल नो. दया ना plz...
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave 21 күн бұрын
9405372708/8080136606
@dinkarvalvi9178
@dinkarvalvi9178 Ай бұрын
मा. आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री व महाराष्ट्राचे मा. शिक्षण मंत्री यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे धन्यवाद...
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
Krushi tirth,
1:08:19
Krushi Tirth
Рет қаралды 4,8 М.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН